आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

चाटोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी समाधान खेलुकर यांची बिनविरोध निवड!!

चाटोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी समाधान खेलुकर यांची बिनविरोध निवड!!

निफाड (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब हिरे यांनी रोटेशननुसार वेळेत राजीनामा दिल्याने निवडणूक अधिकारी सरपंच अरुणा विश्वनाथ हांडगे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या सभेत मा.आमदार अनिल कदम समर्थक शिवसेना गटाचे समाधान विठ्ठल खेलुकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या अर्जावर राहुल गायकवाड यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. या वेळी ग्रामसेविका सनेर मॅडम, सरपंच अरुणा हांडगे, मा.उपसरपंच बाळासाहेब हिरे,ग्रा.सदस्य अनिता कदम, जिजाबाई खेलुकर,भाऊसाहेब घोलप, द्रौपदा भोईर, सविता डमाळे, मा.सरपंच सारिका हांडगे, राहुल गायकवाड, शोभा घोलप,भाऊसाहेब सोनवणे,लक्ष्मण धोंगडे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी चांदोरीचे मा.सरपंच संदीपआबा टर्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप आबा गडाख, गोंडेगावचे सरपंच संजय दाते, तंटामुक्तीचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा हिरे, पो.पाटील सचिनजी हांडगे, शिवाजन्मोत्सव समिती अध्यक्ष सुरेशजी घोलप, दिलीप आण्णा कदम, चेअरमन सदाशिवभाऊ खेलुकर, दीपक पाटील कदम, राजेंद्र खेलुकर, शांताराम हांडगे, राजेंद्र कटारे, नारायण वरखेडे, देवराम खेलुकर, खंडू भोईर, महेश खेलुकर, सावळीराम खेलुकर, सुनील हांडगे, कोंडाजी वरखेडे, अरुण कर्डक,संजय खेलुकर, अशोक डमाळे, गणेश वाणी, गणेश खेलुकर, कोंडाजी खेलुकर, सतीश वरखेडे, संजय घोलप, अनिल हिरे, बाळु कटारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

चाटोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी युवासैनिक समाधान खेलूकर यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष करताना ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.