आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे ) येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर व हळदीकुंकु कार्यक्रम झाला संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे ) येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर व हळदीकुंकु कार्यक्रम झाला संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे )येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिर व हळदीकुंकु कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे ग्रामपंचायत पारगाव (शिंगवे),मोरया युवा प्रतिष्टान व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्ममाने हळदी कुंकु व आरोग्य तपासणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मोठया संख्येने महिला भगिणी उपस्थित होत्या.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व महिलांनी एकत्र आलं पाहिजे.त्यांना असणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम केलं पाहिजे,असे प्रतिपादन सरपंच श्वेता ढोबळे यांनी केले.

यावेळी गावातील विधवा महिलांचा विषेश सन्मान करण्यात आला.उपस्थित महिलांना यावेळी आंब्यांचे झाड सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.सर्व महिलांसाठी या वेळी भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती.

या प्रसंगी सरपंच श्चेता ढोबळे,मा. जि.प.अध्यक्ष शैलजाताई ढोबळे,प्रज्ञा कुलकर्णा,ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद, काळूराम लोखंडे,सदस्या रोहिणी देवडे,अंकिता लोखंडे,गितांजली लोंढे, राजश्री ढोबळे,लता ढोबळे,प्रियंका ढोबळे,गौरी ढोबळे, रेखा लबडे,डाॅ.भोर ,डाॅ,सहाणे व ग्रामविकास अधिकारी के. डी.भोजणे,ग्रामपंचायत कर्मचारी व महिला भगिनी,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.