आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड!!

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण), संचलित आत्मा मालीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (अम्रित) या अभियांत्रिकी महाविद्यालयात परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने , समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय उमेशजी जाधव साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाने कार्यरत असलेल्या आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शुक्रवार दि १९/०१/२०२४ रोजी “Q-Spiders” या कंपनीचे, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनीक्स अँड टेलीकॉम इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह करीता डिग्रीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या ड्राईव्ह करीता कंपनीचे पदाधिकारी कु.मनीषा आणि कु. सिद्धेश्वरि यांनी प्री प्लेसमेंट टॉक, ॲपटीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व टेक्निकल इंटरव्ह्यू या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली.

या सर्व निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत आत्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चचा ढोने धीरज विनोद व पाटील सदिच्छा प्रमोदया विद्यार्थ्यांची निवड झाली.य दोन्हीं विद्यार्थ्यांना स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय श्री उमेशजी जाधव साहेब यांच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

प्लेसमेंट ड्राईव्ह च्या सुरुवातीला आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ डी डी शिंदे सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले तसेच Q-Spiders कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी नियोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.दिपक बाविस्कर यांनी केले. तसेच प्रा. पुजा शिंदे , प्रा. संतोष घुले, प्रा. मेघराज सासे, आदीसह विद्यार्थी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.