आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ संकुलामध्ये राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न!!डिप्लोमा व डिग्री २५ महाविद्यालयातून ३७८ प्रकल्प सादर!!

समर्थ संकुलामध्ये राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न!!

डिप्लोमा व डिग्री २५ महाविद्यालयातून ३७८ प्रकल्प सादर!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे व समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय बेल्हे येथे “समर्थ टेक्निकल फेस्टिवल २०२४”अंतर्गत नुकतीच राज्य स्तरीय
तांत्रिक प्रकल्प स्पर्धा व पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे उद्घाटन चाकण येथील एल अँड टी कंपनीचे सिनियर डेप्युटी मॅनेजर अमित मोकाशी व गोरखनाथ औटी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
या प्रकल्प स्पर्धेसाठी पुणे व नगर जिल्ह्यातून ३७८ प्रकल्प आणि १०३४ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने नवनवीन कल्पना,तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या कार्यशाळेत दिसून आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अमित मोकाशी म्हणाले की या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांची कल्पकता,नवनिर्मिती पाहायला मिळते.दैनंदिन जीवनात आपल्या तांत्रिक कौशल्याचा,शिक्षणाचा उपयोग करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा.इंजिनियर म्हणजे उत्साह,प्रयत्न,ऊर्जा,कार्यक्षमतेचा अखंड स्रोत असून अर्थव्यवस्था बळकट करणारा समाजातील सर्वात जबाबदार घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते असे मोकाशी म्हणाले.

प्रकल्प स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
इंजिनिअरींग विभाग:
प्रथम क्रमांक-
तमन्ना शेख (मिल्क क्वालिटी अनालिसिस यूजिंग आय ओ टी)समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे
प्रतीक्षा फापाळे (रेन रूफिंग सिस्टिम यूजिंग आय ओ टी )
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे

द्वितीय क्रमांक:
तेजस गवळी (स्मार्ट डोर लॉक अँड होम ऑटोमेशन)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,अवसरी
यश दौंड (ग्राफिकल पासवर्ड ऑथेंटीकेशन)
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग,कर्जुले हर्या

तृतीय क्रमांक:
गायत्री तांबोळी (सोलर आऊटडोअर प्युरीफायर)
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे
कुंतल वामन (पिलसी बेस्ड गॅस डिटेक्शन) समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे

उत्तेजनार्थ:
सिद्धार्थ वाघ( स्मार्टफोन कंट्रोल आर्म रोबोट) समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे

इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
पॉलिटेक्निक विभाग:
प्रथम क्रमांक
प्रथमेश टेंभेकर (ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग किट ) समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे
विशाल चव्हाण (सीड बॉल ड्रॉपिंग युजिंग ड्रोन)
शासकीय तंत्रनिकेतन,अवसरी

द्वितीय क्रमांक
प्रतीक भोर (रडार सिस्टीम युसींग अर्डीनो)समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे
प्रतीक डुकरे (पासवर्ड बेस्ड डोर लॉकिंग सिस्टीम)शासकीय तंत्रनिकेतन,अवसरी

तृतीय क्रमांक
चैतन्य शेंडकर (ई- वेहिकल चार्जिंग स्टेशन युजिंग सोलर)समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे
चैतन्य तांबे (होम ऑटोमेशन युसिग् ब्ल्यू टूथ) जयहिंद पॉलिटेक्निक,कुरण

कॉम्प्युटर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स,डाटा सायन्स इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-
हरीश धसरवार (ड्रोन डिटेक्शन सिस्टीम युजिंग ए आय) समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे

द्वितीय क्रमांक –
श्रुती भुजबळ (इंडस्ट्रियल प्रोटेक्शन सिस्टीम युजिंग आयओटी)
श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती, अहमदनगर

तृतीय क्रमांक –
अभिषेक शिंदे (ई -फार्म मॅनेजमेंट सिस्टीम)
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग
संज्योत बाळसराफ (ए आय बेस्ड सीसीटीव्ही सिस्टीम) जयहिंद कॉलेज कुरण

उत्तेजनार्थ-
प्रणव शिंदे (आर्टिफिशल रोबोट) समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे

पॉलिटेक्निक विभाग
प्रथम क्रमांक
मयंक मुळे (सेंटीमेंटल अनालिसिस युजिंग ए आय)समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे

द्वितीय क्रमांक-
शार्दुल गागरे (सीआरपी फॉर कॉलेज फीज मॅनेजमेंट सिस्टीम) डॉ. पी व्ही व्ही पी पॉलीटेक्निक लोणी, अहमदनगर
आकाश देशमुख (ॲग्री बोट) शासकीय तंत्रनिकेतन,अवसरी

तृतीय क्रमांक
सुजल दळवी (सेफ रिच) अडसूळ टेक्निकल कॅम्पस चास, अहमदनगर

मेकॅनिकल व सिव्हिल
इंजिनिअरिंग विभाग
प्रथम क्र
मनिष भोर व ग्रुप (ऑटोमॅटिक थ्रीडी प्रिंटर)
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे

द्वितीय क्र
सिद्धेश आहेर व ग्रुप (ऑटोमॅटिक फॅन स्पीड कण्ट्रोल) जयहिंद कॉलेज कुरण

तृतीय क्र.-
संजय गुंजाळ आणि ग्रुप (फॉर्मेशन ऑफ ब्रिक फ्रॉम काऊ डंक एश) समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बेल्हे

डिप्लोमा विभाग
प्रथम क्र
प्रमोद गुंजाळ आणि ग्रुप (मोबाईल मॅन्युअल वॉटर प्युरीफिकेशन) समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे

द्वितीय क्र
चैताली भोये (फायबर रेन्फोर्स काँक्रिट) अमृतवाहिनी पॉलीटेक्निक संगमनेर

तृतीय क्र.
प्रतीक्षा चोरमुंगे आणि ग्रुप (स्मार्ट हायवे) अडसूळ पॉलिटेक्निक कॉलेज चास,अहमदनगर

पोस्टर सादरीकरण स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
इंजिनिअरिंग विभाग
प्रथम क्रमांक
मानसी यादव व सानिका लामखडे
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे

द्वितीय क्रमांक
सिद्धी कुऱ्हाडे व भूमिका टेमकर (सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राजुरी)

तृतीय क्रमांक
ऐश्वर्या उंडे व श्रेया अंडे
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
ऋतुजा भांबेरे व कोमल ससाणे
अडसूळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चास, अहमदनगर

पॉलिटेक्निक विभाग
प्रथम क्रमांक
हर्षदा थोरे,वनिता कुसळकर आणि अक्षदा कोटकर (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर)

द्वितीय क्रमांक
सानिका शेरकर
समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे

तृतीय क्रमांक
श्रेयस थोरात व गौरी लोहोटे
शासकीय तंत्रनिकेतन,अवसरी
कल्याणी भोर व पायल गवारी
जयहिंद पॉलिटेक्निक कुरण

प्रथम क्रमांकासाठी रुपये ५ हजार रोख,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक साठी रुपये ३ हजार तर तृतीय क्रमांकासाठी रुपये २ हजार असे या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप होते.

विजेत्या सर्व स्पर्धकांना मिळून एक लाख रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रकल्प स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा.विनोद चौधरी यांनी काम पाहिले.
सर्व विभागप्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन पोखरकर व प्रा.रोहिणी रोटे यांनी,प्रास्ताविक प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी तर आभार प्रा.निर्मल कोठारी यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.