आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

TVS मार्फत जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला – हरवलेला चिवचिवाट पुन्हा जागवण्यासाठी!!

TVS मार्फत जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला – हरवलेला चिवचिवाट पुन्हा जागवण्यासाठी!!

वाळुंजनगर – TVS कंपनीच्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्ट मार्फत जागतिक चिमणी दिनाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमामध्ये महिलांनी व मुलांनी स्वतः हाताने चिमणी संवर्धनाचे पोस्टर व घरटी बनविण्यात आली होती .
TVS कंपनीच्या CSR विभागामार्फत आंबेगाव,खेड,शिरूर तालुक्यामध्ये ग्रामविकासाचे काम चालू आहे .यामध्ये आर्थिक विकास ,आरोग्य,पाणलोट विकास,पर्यावरण व पायाभूत सुविधा याविषयावर काम केले जाते.
चिमणी संवर्धनामध्ये TVS मार्फत मुळूकवस्ती (खडकवाडी)व वाळुंजनगर या ठिकाणी प्रत्येकी ५०-५० घरट्याचे वाटप करण्यात आले . चिमणी संवर्धनाबाबत शालेय विध्यार्थीमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यासाठी सौ. दीपाली वाटवे – पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षक या प्रमुख वक्त्या म्हणून बोलवण्यात आल्या .
TVS ने १४ ते २० मार्च हा पूर्ण आठवडा चिमणी संवर्धन सप्ताह म्हणूनसाजरा केला या दरम्यान चिमणी विषयी जनजागृती करणारे विविध कार्यक्रम राबविण्यात आले . यामध्ये चिमण्यांसाठी घरटे बनविणे, चित्रकला स्पर्धा , पोस्टर बनविणे , रांगोळी स्पर्धा अशा विविध संकल्पना चिमुकल्यासोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , वाळुंजनगर येथे राबविल्या गेल्या . या प्रसंगी वाळुंजनगरच्या सरपंच सौ . तृप्तीताई वाळुंज व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सौ . एस . एस. राजहंस , तसेच सौ .एस . यु . भालेराव वनपाल धामणी व श्री . वाय . टी . निघोट वनरक्षक लोणी , श्री . डी . आर . वाघ वनसेवक धामणी आदी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . उषा देशमुख यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक TVS कंपनीचे विभागीय अधिकारी योगेश्वर पाटील यांनी केले . उपस्थित मान्यवरांचे आभार सौ संगीता वाळुंज यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी TVS SST च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .

चिमणी व शेतकरी यांचे पर्यावरण संवर्धनात असणारे स्थान व उपयुक्तता तसेच चिमण्यांची घटणारी संख्या व चिमणी संख्येत वाढ करण्यासाठी करावयाचे उपक्रम याविषयी सौ. दीपाली वाटवे यांनी मार्गदर्शन केले .

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.