आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

TVS च्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या माध्यमातून खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे “मिलेट व महिला आरोग्य” या संकल्पनेवर जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा!!

TVS च्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या माध्यमातून खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे “मिलेट व महिला आरोग्य” या संकल्पनेवर जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा!!

 

TVS च्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या माध्यमातून खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे “मिलेट व महिला आरोग्य” या संकल्पनेवर जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

TVS कंपनी यांच्या वतीने मौजे खडकवाडी ता.आंबेगाव जि. पुणे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बचत गटातील महिलांनी स्वतःच्या हाताने मिलेटचा वापर करून सुंदर असे पोस्टर तयार केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये मिलेटचा वापर करून महिलांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या.

TVS कंपनीच्या CSR विभागामार्फत शिरूर, आंबेगाव व खेड या तालुक्यांमध्ये ग्राम विकासाचे काम चालू आहे. यामध्ये आर्थिक विकास, शिक्षण, आरोग्य, पाणलोट विकास, पर्यावरण व पायाभूत सुविधा या विषयावर काम केले जाते. महिलांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेच्या माध्यमातून 270 बचत गट चालवले जातात. ज्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण केले जाते. याच विषयाला अनुसरून महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी,त्यांच्यात आरोग्य विषयी जागृती निर्माण होण्यासाठी यावर्षीचा जागतिक महिला दिवस हा “मिलेट व महिला आरोग्य” या संकल्पनेवर राबविण्यात आला.

भारत सरकारच्या माध्यमातून सन 2023 हे मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.साजरे करण्यात आले. मिलेटचा आरोग्यासाठी असलेला फायदा लक्षात घेता मिलटचे आहारातील प्रमाण वाढावे म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सौ चैताली काळबोंडे (आहार तज्ञ, ससून हॉस्पिटल, पुणे.) यांनी मिलेट म्हणजे काय? व त्याचे प्रकार व त्यांचे आहारातील महत्त्व आणि आरोग्यास होणारे फायदे या संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रत्येक धान्यांमध्ये असणारे पोषक तत्त्व हे कोणत्या आजारावर प्रतिबंध होऊ शकतो याविषयी माहिती दिली.

सौ निवेदिता शेटे कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव. (होम सायन्स, विभाग प्रमुख) यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मिलेट पासून बनवलेल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या व्यवसायिक संधींची ओळख करून दिली. या निमित्ताने शहरी भागामध्ये कशा पद्धतीने महिला बचत गट आपला व्यवसाय उभा करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ तृप्ती महेंद्र वाळुंज सरपंच वाळुंजनगर, सौ मीराताई संजयशेठ पोखरकर सरपंच वडगाव पीर,सौ जयश्री शिंदे ICDS सुपरवायझर, आंबेगाव पंचायत समिती सौ शेळके मॅडम कृषी सहाय्यक, खडकवाडी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. कमलताई सुक्रे सरपंच, खडकवाडी या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दीक्षा गुलाब वाळुंज यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उषा देशमुख यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.संगीता वाळुंज यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी TVS – श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्ट च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.