आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अक्षय, ज्याचा कधी क्षय होत नाही तो अक्षय!!

अक्षय, ज्याचा कधी क्षय होत नाही तो अक्षय!!

धामणी गावचा ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य!!!कै. शिवाजी राजे विधाटे यांचा मुलगा. सात आठ वर्षांपूर्वी अक्षय ची हीच ओळख. परंतु स्वतःच्या कर्तुत्वाने व वागणुकीने त्याने धामणी आणि परिसरामध्ये स्वतःच एक स्थान निर्माण केलं. स्वतःची ओळख निर्माण केली. आणि आज गावामध्ये व समाजामध्ये एक गोरगरीब लोकांचा मसीहा म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे. असा अक्षय!!

२०१७ साली धामणी गावाचा सागर लोकनियुक्त सरपंच झाला आणि सागर चा साथीदार म्हणून कोणतेही पद नसताना अक्षय गावचा उपसरपंच झाला! त्याला कारण तसंच होतं. पाच वर्षे सागरच्या खांद्याला खांदा लावून अक्षय ने काम केले अक्षयच्या रूपामध्ये मला तर कै. शिवाजी राजे नेहमी दिसतात .सागरच्या बॉडी मध्ये संगीता वहिनी सदस्य झाल्या. नंतरच्या काळामध्ये उपसरपंच झाल्या! वहिनी तशा शांत परंतु वहिनींची कमी अक्षयने कधी भासू दिली नाही! एक शांत संयमी व लोकांच्या अडीअडचणीला उभा राहणारा अक्षय! म्हणून आज गावामध्ये त्याची एक वेगळी ओळख आहे.

सर्व समावेशक स्वभाव ,पुढच्याच समजून घेणे ,एखाद्याने काम सांगितलं तर स्वतःच्या घरातल्या प्रमाणे काम करणे, लोकांच्या सुखात दुःखात सहभागी होणे !विशेषता सागरच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे. हे काम अक्षय अत्यंत चांगल्या पद्धतीने आजही करत आहे !म्हणून आज गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत अक्षय आहे. कै.राजेंनी माझ्या राजकीय कारकीर्दीत मला खूप साथ दिली !राजे नंतर वहिनी असतील अक्षय असेल हे सुद्धा माझ्या बरोबरीने काम करतात. त्याचा मला अभिमान आहे!

अशा अक्षयला जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा…
सदैव आपला… रवींद्र करंजखेले.. पंचायत समिती सदस्य..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.