आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे महाशिवरात्र उत्साहात संपन्न !!

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे महाशिवरात्र उत्साहात संपन्न !!

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील पुरातन पेठेतील पुरातन महादेव मंदिरात व पवित्र संगमावरील मंदिरात महाशिवरात्र सोहळा भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

शुक्रवारी पहाटे महादेवाचा अभिषेक राहूल जाधव,अरुण बोर्‍हाडे,रामदास जाधव,स्वप्निल शिंदे,मयुर रोडे या पाच जोडप्याच्या हस्ते करण्यात आला.

महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले.यावेळी दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती.त्यानंतर सकाळी ह.भ.प.ॠषिकेश महाराज नापदे आळंदीकर यांचे किर्तन झाले. यावेळी भाविकांना खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.

महादेव मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई केलेली होती.दुपारी आळंदी येथील भावशक्ति वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकर्‍यांचे भजन झाले.

यावेळी सरपंच सौ रेश्मा बोर्‍हाडे.माजी सरपंच सागर जाधव,संदीप आळेकर,गणपत भांडारकर,बाबाजी गाढवे,दिनकर रोकडे,मुरलीधर देखणे उपस्थित होते.पवित्र संगमावरील महादेव मंदिरात अभिषेक श्री उत्तमराव जाधव व दिनेश जाधव यांच्या हस्ते तर श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिराचे आवारातील महादेव मंदिराची पूजा पांडुरंग भगत,राहूल भगत,सुभाष तांबे,राजेश भगत,नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आली.

धामणीच्या पेठेतील या पुरातन महादेव मंदिराचा आणि संगमावरील पवित्र श्री महादेव मंदिराचा नुकताच लोकवर्गणीतून आकर्षक व भक्कम जिर्णोध्दार केल्याने पेठेतील व संगमावरील महादेव मंदिर व परिसर सुशोभित दिसत असल्याचे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी व ग्रामस्थांनी सांगितले.पहाडदरा येथील वाघदर्‍यातील पुरातन महादेव मंदिरात सरपंच मच्छिंद्रनाथ वाघ,गणेश वायकर,दत्तात्रय वीर यांच्या हस्ते पहाटे पूजा करण्यात आली.त्यानंतर ह.भ.प. तान्हाजी महाराज तांबे यांचे किर्तन झाले.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती.यावेळी भाविकाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.