आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जल्लोष २०२४ कार्यक्रमात जमले १.२५ लक्ष रुपये!!

धामणी जि.प.शाळेचा जल्लोष २०२४ कार्यक्रमात जमले १:२५ लक्ष रुपये!!

धामणी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम हा कौतुकाचा विषय राहिला आहे. याहीवर्षी मोठ्या उत्साहात सायंकाळी ६ ते १० या वेळेत संपन्न झाला कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी ला तब्बल १:२५ लक्ष रुपयाची देणगी दिली.

प्राथमिक शाळा धामणी मध्ये अनेक वैविध्य उपक्रम राबविण्यात येतात त्याचे कौतुक सर्व स्थरातुन होत असते. या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार, दिनांक ०७ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाले विशेषतः महीलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कौतुकाची गोष्ट म्हणजे संपुर्ण संस्कृतीक कार्यक्रमाचे निवेदन आराध्य जाधव व हर्ष विधाटे या विद्यार्थ्यांनी राजा आणि प्रधान यांच्या रुपात सादरीकरण केले. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था असल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक महेश पाटिल हे होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात गणपती बाप्पा च्या गीताने झाली. लहान मुलांचे नृत्य पाहुन ग्रामस्थ हरखून गेले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकुण १२ गाणी सादर केली.प्रत्येक गीताला साजेशी वेशभूषा असल्याने पाहणारे हरखुन जात होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य पाहुन पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रत्येक नृत्यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची खैरात केली.

या कार्यक्रमात काही सन्मान करण्यात आले. जिल्हा परिषद च्या वतीने तालुक्यास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल कविता कोठावळे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.शैक्षणीक वर्षे सन २०२३-२४ चे आदर्श विद्यार्थी समर्थ विघ्नहरी विधाटे व आदर्श विद्यार्थीनी श्रावणी सोमनाथ सोनवणे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ७ मार्च आशा सेविका दिन असल्यामुळे धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अशा सेविका रंजना विधाटे ,सविता जाधव , सविता गाढवे यांचा कार्यक्रमात सत्कार सन्मान करण्यात आला. भोजनाची व्यवस्था शिशिर बढेकर, राहुल जाधव, प्रदिप कुं. बढकेर,देविदास करंजखेले, निलेश रोडे, संदिप गाढवे यांनी केली होती.

त्याप्रसंगी उद्योजक विलास पगारिया यांनी बोलताना सांगितले की धामणी जिल्हा परिषद शाळेनी अल्पावधीत केलेली सर्वागिण प्रगती ही खरच वाखाणण्याजोगी आहे. शहरात विद्यार्थांना ज्या प्रकारच्या भौतिक सुविधा दिल्या जातात तशा प्रकारच्या सुविधा धामणी जिल्हा परिषद शाळेत दिल्या जातात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
युवा उद्योजीका ॲड. सोनाली धामणीकर यांनी सांगितले की धामणी शाळेची मी माजी विद्यार्थ्यांनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.मी आज जे काही यश मिळवु शकले त्यात जिल्हा परिषद शाळेचा मोलाचा वाटा आहे. आजचा सांस्कृतिक कार्यक्रम हा खुप दर्जेदार आहे.

कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, पारगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नेताजी गंधारे, भगवंत टाव्हरे ( धामणी केंद्र प्रमुख ), सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, उद्योजक शांताराम जाधव, उद्योजक विलास पगारिया, महावितरण चे अधिकारी नितीन शिंगे,उद्योजिका ॲड. सोनाली धामणीकर, उद्योजक मंगेश नवले, मा. पोलीस निरीक्षक अशोक जाधव, डॉ. प्रशांत बोऱ्हाडे, डॉ. प्रतिभा लबडे, उद्योजक प्रमोद वाघ, दशरथ बोऱ्हाडे, मा . सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, शालेय व्यवस्थापान कमेटी चे अध्यक्ष महेश कदम, उपअध्यक्षा स्वाती विधाटे , उद्योजक प्रदिप भुमकर, शिवसेना शाखाप्रमुख दीपक जाधव , पोलीस पाटील सुरज जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे,सुरेखा ताई रोडे, प्रतिक जाधव,मा.उपसरपंच मिलिंद शेळके ,मा. ग्रा. सदस्य आनंदराव जाधव, राहुल जाधव, मराठा योद्धा शांताराम जाधव, दिनेश जाधव (कोरिओग्राफर ), शरद जाधव ,अमोल जाधव , सोमनाथ सोणवने , माधव बोऱ्हाडे, सोमनाथ जाधव रोहित भुमकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे शिक्षिका विजया हिंगे , कविता कोठावळे मॅडम, उर्मिला केदारी मॅडम ,ज्योती बोऱ्हाडे मॅडम , रुपाली जाधव मॅडम , स्वाती सोनवणे मॅडम कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनुराधा कथले आणि सुत्रसंचालन मा.सरपंच अंकुशराव भुमकर यांनी केले .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.