आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

हास्य हेच निरोगी आयुष्याचे रहस्य-बंडा जोशी…समर्थ मधील जेष्ठ नागरिक कार्यशाळेला ३०० ज्येष्ठांची उपस्थिती!!

हास्य हेच निरोगी आयुष्याचे रहस्य-बंडा जोशी

समर्थ मधील जेष्ठ नागरिक कार्यशाळेला ३०० ज्येष्ठांची उपस्थिती!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिक कार्यशाळा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाली.धमाल विनोदी एकपात्री,हास्य पंचमी या कार्यक्रमाचे जनक बंडा जोशी यांनी जेष्ठ नागरिकांना आपल्या विनोदातून व किस्स्यातून मनमुराद निखळ आनंद दिला.हास्य हेच निरोगी आयुष्याचे रहस्य असून हास्यातून मनोरंजन आणि मनोरंजनातून हास्य हेच यशस्वी जीवनाचे सूत्र असल्याचे बंडा जोशी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक समाज व्यवस्थेचे मार्गदर्शक असतात.त्यांच्या अनुभवाचा ठेवा आपण जपावा.तसेच समाज उपयोगी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्त्वाची असून संस्कृती,रूढी-परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांची समाजाला नितांत गरज असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.

गझलकार डॉ.जयसिंग गाडेकर यांनी “आपली जीवनशैली-आपल्या आनंदाची गुरुकिल्ली” या विषयावर विस्तृतपणे माहिती दिली.

दत्तात्रय पायमोडे यांनी “कविता काही तुझ्या काही माझ्या,कविता कळी पासून खळी पर्यंत” सादर केल्या.अनिल काळे यांनी वृद्ध आणि मानवाधिकार याबद्दल माहिती सांगितली.बाळकृष्ण लळीत यांनी महाराष्ट्रातील लोककला आणि पर्यटन या विषयावर अत्यंत मौलिक आणि सांस्कृतिक माहितीचा ठेवा उपस्थितांपुढे ठेवला.यावेळी संस्थेच्या वतीने समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे,राजुरी येथील शिवाजी हाडवळे,अलकाताई काळे, हसन पठाण,यशवंत नाना गुंजाळ,भागाशेठ शेळके,प्रताप कुऱ्हाडे,बबनराव बोरचटे,भाऊसाहेब बांगर,धोंडीभाऊ कुंजीर,भागुजी शिंदे,रामदास बांगर,प्रा.फकीर आतार,गोपीनाथ शिंदे,पांडुरंग गगे,नामदेव गगे तसेच ३०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक या कार्यशाळेस उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ. रमेश पाडेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे तसेच सर्व भागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार लक्ष्मण घोलप यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.