आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेत भाविकांकडून जिर्णोध्दारासाठी ३,४०,०००/- देणगी जमा!!

धामणी(ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेत भाविकांकडून जिर्णोध्दारासाठी ३,४०,०००/- देणगी जमा!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत देवस्थानाच्या दोन दिवसाच्या (२४ व २५फेब्रुवारी २०२४) यात्रेत मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी भाविकांनी रुपये ३,४०,०००/रोख जमा झाले असल्याचे समस्त ग्रामस्थ धामणी,पहाडदरा,शिरदाळे व ज्ञानेश्वर वस्ती आणि सेवेकरी मंडळीजिर्णोध्दार समितीने सांगितले.

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री खंडोबा देवस्थान पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे कुलदैवत असून माही पुनवेच्या यात्रेला तळीभंडार करण्यासाठी व देवाचे दर्शनासाठी हजारो भाविक आवर्जुन येत असतात.नुकत्याच झालेल्या यात्रेच्या दोन दिवसात मंदिर व परिसर जिर्णोध्दारासाठी हजारो भाविकांनी रुपये ३,३७,८९५/- रक्कम देणगी स्वरुपात जमा केली असल्याचे सांगण्यात आले.

खंडोबा मंदिराचे व परिसराचे जिर्णोध्दाराचे काम चांगले व टिकाऊ झालेले असून येथील मंदिर जागृत व नवीन तरुणाईसाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकप्रिय होत असल्याचे गावडेवाडी,महाळुंगे पडवळ,लांडेवाडी,तळेगाव ढमढेरे,कूरकूटवाडी येथील भाविकांनी सांगितले.दोन दिवसाच्या यात्रेत जमा झालेल्या देणगीची सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.रु ३,३७,८९५/-(रुपये तीन लाख सदतीस हजार आठशे पंच्याण्णव मात्र) मंदिर जिर्णोध्दारासाठी देणगी दिल्याबद्दल सर्व देणगीदाराचे,भाविकांचे समस्त ग्रामस्थ धामणी,पहाडदरा,शिरदाळे व ज्ञानेश्वर वस्ती आणि श्री खंडोबा मंदिर जिर्णोध्दार समिती यांनी आभार मानले आहेत.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.