आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरूर तालुक्याच्या कवठे गावातील शिवसैनिकांची बैठक उत्साहात संपन्न!!

शिवसेना शिरूर तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्याच्या कवठे गावातील शिवसैनिकांची बैठक ग्रामपंचायत सभागृह कवठे येथे उत्साहात संपन्न झाली.

बैठक प्रसंगी अक्षयदादा आढळराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन कवठे गावातील लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या सूचनांची नोंद घेऊन संघटना वाढविण्यासाठी लक्ष देणार असल्याचे सांगितले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, उद्योग आघाडी जिल्हाप्रमुख अभिजित बत्ते, युवासेना समन्वयक गोवर्धन पाचंगे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संग्राम शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अमोल पोकळे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, अंकुश शेवाळे, अविनाश पोकळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.