आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्याच्या पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांची बैठक पारगाव(शिंगवे) येथे उत्साहात संपन्न!!

शिवसेना आंबेगाव तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्याच्या पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांची बैठक पारगाव(शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाली.

बैठक प्रसंगी अक्षयदादा आढळराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी खासदार नसतानाही शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करुन दाखविल्याने जनता समाधानी असल्याने दादा पुन्हा खासदार होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील विविध गावचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या सूचनांची नोंद घेऊन संघटना वाढविण्यासाठी लक्ष देणार असल्याचे सांगितले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, निरगुडसर गावचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, हनुमंत तागड, युवासेना पुणे जिल्हा समन्वयक सुनिल गवारी, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, पारगाव ग्रामपंचायत सदस्या सौ.रोहिणीताई देवडे, शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे, युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षयराजे विधाटे, बजरंग देवडे, युवासेनेचे वैभव वाव्हळ, आदेश डोके, अमर गायकवाड, उत्तम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.