आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे (ता.आंबेगाव) ग्रामस्थांनी मराठा आंदोलकांसाठी पाठवले जेवण!!

आमचंही छोटंसं योगदान मराठ्यांचा क्रांतिसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी!!

मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी,आमच्या भविष्यासाठी!!

आज रांजणगाव गणपती येथे मराठा आंदोलक श्री मनोजदादा जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलनाचा मुक्काम आणि जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी आणि आंदोलनात सहभागी बांधवांसाठी आम्ही शिरदाळे ग्रामस्थांना आवाहन केल्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी याला उदंड प्रतिसाद देत भाकरी,चपाती,शेंगदाणा चटणी,मेथीची भाजी,लसणाची चटणी असा आहार आज हनुमान मंदिरात जमा केला.

शिरदाळे गावातील भविष्यातील पिढीने हे अन्न जमाकरण्याचे काम केले. हा कोणीतरी माणूस आमच्या भविष्यासाठी लढत आहे,झटत आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे ही भावना घेऊन सर्वांच्या सहकार्याने आज हा उपक्रम शिरदाळे ग्रामस्थांनी यशस्वीपणे संपन्न केला.

हा संपूर्ण आहार शिरदाळे गावचे उपसरपंच श्री.बीपीनशेठ चौधरी आणि युवा सहकारी कु.अनिकेत चौधरी यांनी कारेश्वर मंदिर कारेगाव या ठिकाणी तेथील सरपंच सौ.निर्मलाताई नवले,उपसरपंच संदीपभैया नवले यांच्याकडे सुपूर्द केली.

आमच्या छोट्याश्या गावाने देखील या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला या कामे फुल न फुलांची पाकळी म्हणून हे योगदान देता आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
एक_मराठा_लाख_मराठा…

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.