आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील इतर कलागुणांना वाव देणे ही गरजेचे – मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन!

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील इतर कलागुणांना वाव देणे ही गरजेचे – मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन!

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील इतर कलागुणांना वाव देणे ही गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, एमसिव्हीसी भागशाळा साल,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनास आढळराव पाटील उपस्थित राहून विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला.

शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील इतर कलागुणांना वाव दिल्यास आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलून येते. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास साधून, स्टेज डेअरिंग ठेवणे, सडेतोडपणे परिस्थितीला सामोरे जाण्याची वृत्ती अंगिकारत आव्हानांवर मात करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवश्यकता आहे. त्यातूनच आपल्या नेतृत्वाचा कस लागून विविध पैलू पडतात, असे मत यावेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष व घोडेगाव शहरप्रमुख तुकाराम काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश काळे, उपाध्यक्ष शाम होनराव, संचालक अजित काळे, संचालक प्रशांत काळे, संचालक सोमनाथ काळे, न्यू इंग्लिश स्कूल चेअरमन बाळासाहेब काळे,बी.डी. काळे महाविद्यालय व्यवस्थापन समिती चेअरमन मुकुंद काळे, शिवसेना तालुका संघटक राजाभाऊ काळे, उपतालुकप्रमुख मिलिंद काळे, ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे, प्रदीप घोडेकर, कांचन काळोखे, शिवाजी घोडेकर, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे संचालक सल्लागार, शिक्षक वृंद, सभासद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.