आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

हिरामण झिरवाळ यांच्या ‘जेथोड’च्या तिसऱ्या आवृत्तीचे रविवारी (१७रोजी) होणार प्रकाशन!!

हिरामण झिरवाळ यांच्या ‘जेथोड’च्या तिसऱ्या आवृत्तीचे रविवारी (१७रोजी) होणार प्रकाशन!!

नाशिक:- उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित ‘जेथोड’ या आत्मकथनाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात संपन्न होणाऱ्या सोहळ्यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे, माजी आमदार हेमंत टकले, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.एकनाथ पगार, अभियंता आणि वाचक ज्ञानेंद्र पाठक, ज्येष्ठ साहित्यिक विजय निपाणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यापूर्वी या आत्मकथनाच्या दोन आवृत्तींना वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तसेच महनीय साहित्यिकांनी हिरामण झिरवाळ यांच्या ध्येयनिष्ठ वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक विलास पोतदार, हिरामण झिरवाळ आणि मित्र परिवाराने केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.