महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर बाळासाहेब हे नाव अजरामर !
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर बाळासाहेब हे नाव अजरामर!!-सुनिल गवारी (समन्वयक युवासेना पुणे जिल्हा)
मेंगडेवाडी (ता.आंबेगाव ) येथे हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली
यावेळी बाळासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण मेंगडेवाडी ग्रामस्थ तसेच शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली
साहेबांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी संपूर्ण भारतभर हिंदूहृदयसम्राट म्हणून आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची अकरावी पुण्यतिथी आहे.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.
महाराष्ट्रासह देशाने बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट हि उपाधी दिली ते सतत मराठी आणि माझ्या मराठी माणसांना पहिलं स्थान मिळण्यासाठी कायम संघर्ष करत राहिले
जन्मापासूनच आक्रमक, निर्णयावर ठाम, धाडसी निर्णय, ‘अरे’ला कारे आणि तडजोड मान्य नसलेल्या सैनिकांची सेना म्हणजे शिवसेना. म्हणूनच शिवसेना ही अल्पावधीतच ग्रामीण भागात रुजली, गावकडच्या युवकांनी बाळासाहेबांना दैवत मानून शिवसेनेसाठी काम केलं. म्हणून गावा-खेड्यात शिवसेना वाढत गेली. बाळासाहेब हाच विचार, शिवसेना हाच विचार मानून शिवसैनिकांनी एकनिष्ठेचं उदाहरण इतर पक्षांपुढे ठेवलं.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा अजरामर जागर बाळासाहेबांनी केला.सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना, बेरोजगारांना आमदार, खासदार मंत्री बनवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे. अशा शब्दांत युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मा.सरपंच तुळशीराम गवारी, जेष्ठशिवसैक सखाराम गवारी, गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, मा.चेअरमन अंकुश मेंगडे, मा.पोलीस पाटील दशरथ मेंगडे, शाखाप्रमुख गणेश मेंगडे, चेअरमन साईनाथ मेंगडे, अमोल मेंगडे, देवराम मेंगडे, बाळासाहेब मेंगडे, संदिप गवारी जयसिंग गवारी व शिवसैनिक उपस्थित होते