आरोग्य व शिक्षणसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसैनिकांनी केले विनम्र अभिवादन !

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसैनिकांनी केले विनम्र अभिवादन !
——————————————
अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल, मराठी मनाचे मानबिंदु, हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त पिंपळगाव(खडकी), ता-आंबेगाव, जिल्हा-पुणे येथे श्रीराम दूध डेअरी पटांगणात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर यांनी मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा इतिहास मांडला. हिंदुत्वाच्या भूमिकेशी शिवसैनिक सदैव वचनबध्द आहेत त्यामुळे बाळासाहेबांचे विचार प्रमाण मानून शिवसैनिकांनी मार्गक्रमण करावे हीच त्यांना आदरांजली असेल असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

अभिवादन सभेस सरपंच दिपक पोखरकर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, शिवसेना मा.विभागप्रमुख शिवाजी पोखरकर, विठ्ठल बांगर, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब बांगर, विठ्ठल पोखरकर माडीवाले, युवानेते निलेश राक्षे, सरोज बांगर, अशोक बांगर, निलेश बांगर, मनोज अरगडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पोखरकर, पोलीस पाटील बबुशा वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.