आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृतीस शिवसैनिकांनी केले विनम्र अभिवादन..!!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृतीस शिवसैनिकांनी केले विनम्र अभिवादन..!!!

अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल, मराठी मनाचे मानबिंदु, हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज धामणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत चौकात जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली.
मा. सरपंच सागर जाधव यांनी बोलताना सांगितले की वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० %समाजकारण व २०%राजकारण हा मंत्र सदैव जपुन शिवसैनिक कार्यरत असतात. हिंदुत्वाचा ज्वलंत विचार व मराठी माणसाला मुंबईत व महाराष्ट्रात मानाचे स्थान देण्यात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोलाचे आहे.

त्याप्रसंगी मा. सरपंच अंकुश भूमकर, सचिव सुभाष नेते जाधव,पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच संतोष करंजखेले, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, जेष्ठ शिवसैनिक मच्छिंद्र अमाप, तानाजी रोडे, संचालक दिपक जाधव , बाबासाहेब बढेकर,उपतालुकाप्रमुख महेश वाघ, राहुलशेठ जाधव ,अविनाश बढेकर, अमोल जाधव, वायरमन मिलिंद जाधव, स्वप्नील बढेकर, शिवाजी जाधव, रोहित भुमकर , योगेश विधाटे, बापु जाधव, आकाश जाधव, दिनेश जाधव , गणपत भंडारकर , राघु रणपिसे , पोपट बढेकर मोठ्या संख्येने शिवसेना , युवासेनेचे पदाधिकारी धामणी ग्रामस्थ उपस्थित होते

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.