आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे दिवाळी पाडव्यानिमित्ताने दीपोत्सव साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे दिवाळी पाडव्यानिमित्ताने दीपोत्सव साजरा!!

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे गावात गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये काकड आरती संपन्न होते आहे शिरदाळे गावचे भूषण वैकुंठवासी ह.भ.प. वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांचे स्मरणार्थ दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने 1001 दिव्यांचे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या निमित्ताने काकड आरती ही संस्कृती जपण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मंडळींचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिरदाळे गावचे सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.