आरोग्य व शिक्षणसामाजिक

कृषीदुतानी शेतकऱ्यांना दाखवले हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक!!

कृषीदुतानी शेतकऱ्यांना दाखवले हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक!!

लांडेवाडी(ता.आंबेगाव )येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना पद्मभूषण वसंत दादा पाटील या कॉलेजमधील कृषी दुतांनी हिरवळीच्या खताचे व्यवस्थापन त्याबद्दल माहिती व त्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते यात भरपूर शेतकरी यांनी लाभ घेतला व प्रात्यक्षिक समजून घेतले

यावेळी कृषीदूत शुभम यादव, ऋषिकेश शितोळे, आदित्य वाडीभस्मे, ऋषिकेश सोनावळे, हर्ष बोरचाटे यावेळी मार्गदर्शन केले. तसेच मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग च्या प्राध्यापक प्रीती नवलकर मॅडम आणि इतर शिक्षकांचे कृषी दूतांना मार्गदर्शन लाभले.

यावेळी विविध प्रकारच्या खते आणि हिरवळीच्या खताचे उपयोग व त्याची आजची गरज याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपण शेतीचा जमिनीची जमिनीतील कस वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा उपयोग करावा याबद्दल याबाबत कृषीदुतांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आणि हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले यासाठी गावातील शेतकरी त्यांची मोलाची मदत लाभली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.