आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील या गावांत दुष्काळ जाहीर कधी होणार?

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील या गावांत दुष्काळ जाहीर कधी होणार?

करपून गेलेली पिके, तळ गाठलेल्या विहिरी,उजाड झालेली माळराने, कोरडे पडलेले पाणीसाठे,ऐन पावसाळ्यात सुरू असलेले टँकर हे चित्र आहे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी,लोणी वडगावपीर,मांदळेवाडी,पहाडदरा, शिरदाळे या गावांतील!!

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एका महिन्यापूर्वी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. स्थानिक शेतकऱ्यांशी,नागरिकांशी संवादही साधला. एक महिना लोटून गेला मात्र पाहणी दौऱ्यात पाहनी केलेल्या गोष्टींवर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. हे अधिकारी नक्की पाहणी दौऱ्यासाठी आले होते की पर्यटनासाठी?असा उद्विग्न सवाल माजी पंचायत समिती सदस्य श्री.रवींद्र करंजखेले यांनी केला आहे.

पाण्याअभावी शेती व जनावरांचे प्रचंड हाल सुरू आहेत.अशा परिस्थितीत या विभागात दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे?अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी,धामणी,वडगावपीर,मांदळेवाडी, पहाडदरा,शिरदाळे ही गावे दुष्काळग्रस्त गावे म्हणून ओळखले जातात. पुऱ्या पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम दुष्काळात होरपळून निघाला आहे. त्यामुळे या परिसरात दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, नुकसान भरपाईची कार्यवाही करून चारा डेपो व रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सदर मागण्या लवकरात लवकर मंजूर न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रतिक्रिया या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.