आंबेगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू!!

शिवसेना शिवसंपर्क अभियान आंबेगाव तालुका !!
महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू असून आज पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक – अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील जारकरवाडी येथे युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे यांनी भेट देऊन शिवसेना संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.
शिवसंपर्क अभियानात आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे शाखाप्रमुख, बूथप्रमुख व शिवदूत निवडण्यात येत असून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची यंत्रणा प्रभावीपणे सज्ज होत आहे. या अभियानाला स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात झालेल्या ह्या अभियानात युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस काळूराम लोखंडे, विशाल कापडी, रमेश वणवे, आदेश डोके, आनंद भोजने, नवनाथ जारकड, विकास गायकवाड, गणेश टाकळकर, वैभव वाव्हळ, सागर जाधव, अक्षय विधाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.