आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ई-पीक पहाणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना इंटरनेटची अडचण!!वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, पहाडदरा गावे नेटवर्क पासून वंचित!!

ई-पीक पहाणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना इंटरनेटची अडचण!!

वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, पहाडदरा गावे नेटवर्क पासून वंचित!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातल्या वडगावपीर,मांदळेवाडी,शिरदाळे, पहाडदरा या गावातील शेतकऱ्यांना ई- पीक पहाणी नोंदवण्यासाठी इंटरनेटच्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कारण या गावांना मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक शेतक-यांना ई-पीक पहाणी पासून वंचित राहावे लागत असल्याचे वडगावपीरच्या सरपंच मीरा पोखरकर,मांदळेवाडी ग्रामपंचायत सदस्य ज्योती गोरडे, शिरदाळे सरपंच जयश्रीताई तांबे यांनी सांगितले.

महसूल विभागाकडून इ पीक पहाणी करण्याचा गाजा-वाजा मोठ्या प्रमाणात केला जातो.परंतु इ पीक पहाणी करताना येणाऱ्या अडचणी वरती शासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही.
पूर्वी शेतकऱ्यांच्या पिकपेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता.अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ॲप निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे. मात्र हे सर्व करण्यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.