निगडाळे(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान!!

अल्पबचत भवन,पुणे : राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील.
निगडाळे(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
अल्पबचत भवन,पुणे येथे शिक्षक थोरात यांस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे,कमलाकांत म्हेत्रे,रणजीत शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक थोरात हे गेले सोळा वर्ष प्राथमिक म्हणून काम करत आहे.श्री.क्षेत्र भीमाशंकर जवळील निगडाळे या आदिवासी शाळेत गेली साडेपाच वर्ष राबवलेले नाविन्यपूर्ण नवोपक्रम, डिजीटल शाळा निर्मिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेद्वारे बालआनंद मेळाव्याचे आयोजन,१००% पटनोंदणी,१००% उपस्थिती,शाळा परिसरात शाळाबाह्य विद्यार्थी नाहीत,विद्यार्थी सर्वागीण गुणवत्ता वाढेतून प्रगत शाळा निर्मितीमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारेतेवेळी आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी,शिक्षणविस्तार अधिकारी गजानन पुरी,शत्रुघ्न जाधव,साने गुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,राष्ट्रपती पुरस्कार विजेते शैलेंद्र चिखले,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनिल पाटील,आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे,चांगदेव पडवळ,संतोष कानडे,मुख्याध्यापिका मनीषा कानडे,संतोष भोर,प्राध्यापिका कमल थोरात,स्वाती पडवळ,प्रदीप चास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.