आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा ! – गो संवर्धन महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन!!

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा ! – गो संवर्धन महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन!!

डॉ सुरेश राठोड:कोल्हापूर प्रतिनिधी
– देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आह, तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो वर्षे शेती, चिकीत्सा आणि पर्यावरण याचे समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गो वंशात आहे, तसेच गाय ही भारतीय अर्थ व्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतिक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाजी गरज आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावी या मागणीचे निवेदन गो संवर्ध महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटना यांनी ९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले.

हे निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख (गो सेवा समिती) शेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. या प्रसंगी गो सेवा समितीचे विठ्ठल मुरकेवार, अनिल जरग, अशोक पोतनीस, कपिल उमराणीकर, संजय चव्हाण, गो संवर्धन महासंघाचे अध्यक्ष विजय वरुडकर, आत्मसाहाय्य सामाजिक संस्थेच्या श्रीमती दिप्ती कदम, ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या सारिका नरवाडे, अमृता जगताप, अल्का लुंगारे उपस्थित होत्या.

याच मागणीसाठी जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या कार्यात सहभागी होण्यासाठी विजय वरुडकर – 75889 54580, तसेच अशोक पोतनीस – 93266 01861 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.