आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कला-गुणगौरव आत्मा आविष्कार सोहळा (२०२४) उत्साहात संपन्न!!

विध्यार्थाच्या कलागुणांना व व्यक्तीमहत्वाला वाव देणे हा प्रमुख उद्देश- कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव 

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कला-गुणगौरव आत्मा आविष्कार सोहळा (२०२४) उत्साहात संपन्न!!

विध्यार्थाच्या कलागुणांना व व्यक्तीमहत्वाला वाव देणे हा प्रमुख उद्देश- कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव 

शहापूर – शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई तानसा धरणाच्या बाजूला असलेल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट(कोकमठाण) संचालित,आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशिर्वादने संत परिवाराच्या प्रेरणेतून तसेच समस्त विश्वस्त स्थनिक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी (शहापूर) येथे विद्यार्थ्यांचा कला-गुणगौरव आत्मा आविष्कार सोहळा (२०२४) कार्यक्रम दि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात विद्यार्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदना,जागरण-गोधळ,छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा लोकनृत्य,तारपा ,कोळी नृत्य, योगा ,गायन, विविध सामाजिक विषयावर पथनाट्य सादर केल्या उपस्थित प्रमुख अतिथीना मंत्रमुगध केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आत्मा मालिक ध्यानपिठाच्या संत भारत माता माता संस्थेचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड , प्रवीण मोरे, शशिकांत सरफरे (विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट मुख्य लेखापाल), अशोक शहाणे (एल.एन.टी ग्रुप सी. ई. ओ) मुंबई,पल्लवी पांडे (ईपिरॉक नाशिक एच.आर ), संदीप बागले(ईपिरॉक नाशिक सहा. व्यवस्थापक) संपत शेंडगे (जी.म क्रुगर इंड प्रा.लि ), नंदकिशोर भाटे (अथर्व फाउंडेशन सी. ई. ओ),
आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उल्हास पाटील यांनी केले असून कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.रुपाली गायकवाड, प्रवीण थोरात सह.समन्वयक प्रा.निशा शेलार, नरेश शेंडे परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयात, विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश विध्यार्थाच्या कलागुणांना तसेच व्यक्तीमहत्वाला वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते.

तसेच कार्यकम यशस्वी करण्यासाठी संकुलाचे पदाधिकारी ,संस्थेचे(शैक्षणिक प्रमुख) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी शिंदे,उपप्राचार्य डॉ गोविंद चव्हाण, सह.व्यवस्थापक गुलाब हिरे आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर ,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आशिष काटे आदी सह प्राध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.