आरोग्य व शिक्षण

खडकवाडीच्या युवकाचा पुणे ते लडाख बाईकवर प्रवास!! पंधरा दिवसात गाठला 6720 कि.मी चा पल्ला!!

खडकवाडी (ता. आंबेगाव ) येथे अजित सुक्रे यांचा सत्कार करताना मान्यवर

खडकवाडीच्या युवकाचा पुणे ते लडाख बाईकवर प्रवास!!

पंधरा दिवसात गाठला 6720 कि.मी चा पल्ला!!

खडकवाडी (ता. आंबेगाव )येथील अजित आदिनाथ सुक्रे ह्या युवकाने पुणे ते लडाख हा सगळा खडतर प्रवास राॅयल ईनफिल्ड हिमालयन या बाइकवर करुन आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडण्यासाठी जवळजवळ 6720 किलोमीटर प्रवास केला आहे
सुक्रे यांनी या प्रवासात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान,हरीयाना,पजांब, हिमाचल प्रदेश, जम्मु- काश्मीर, लडाख असा खडतर प्रवास बुलेट बाइकवर केला. उंच ठिकाण खारदुंगला पास (समुद्र सपाटी पासून उंची 17582 फुट) हे ठिकाण मोठ्या धाडसाने त्याने सर केले .ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता तसेच वातावरण वजा 15 डिग्री आहे अश्या ठिकाणी जिव धोक्यात घालून जिद्धीने हि सफर त्याने यशस्वी केली . त्याबद्दल सुक्रे यांचा सत्कार खडकवाडी ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात आला.

या प्रसंगी माजी सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे, सोसायटी संचालक वसंत भागवत,बाळासो धुमाळ, भिमराव लंघे,हभप नितीन महाराज सुक्रे,गुलाब वाळुंज,किरण वाळुंज, विश्वास सुक्रे,सुरेश वाळुंज,धनंजय शिंदे,माऊली वाळुंज,शेखर सुक्रे,माऊली सु्क्रे,रवि पोखरकर उपस्थित होते.

खडकवाडी (ता. आंबेगाव ) येथे अजित सुक्रे यांचा सत्कार करताना मान्यवर

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.