आंबेगावच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करू-देवदत्त निकम

आंबेगावच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करू-देवदत्त निकम
कुकडी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या डिंभे धरणातून (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) बोगद्यामधून जुन्नर तालुक्यातील धरणांना पाणी सोडणार आहे. मंत्रालय स्तरावर या संदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत. बोगद्यामधून पाणी नेण्यास आमचा विरोध असून तसे झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम यांनी दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल जारकवाडी ग्रामस्थ व वीरभद्र डेअरी यांच्यावतीने जारकरवाडी येथील पांडुरंग मंदिरात देवदत्त निकम यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वीरभद्र डेरीचे चेअरमन गोरक्ष भांड,सोसायटीचे व्हाईस चेअरमन संतोष कापडी, आंबेगाव मनसे संपर्कप्रमुख बाबाजी देवडे, संजय बढेकर,संतोष लबडे, विशाल पाचपुते, नवनाथ जारकड, जालिंदर भांड,अशोक धानापुणे, संजय रोडे,चिंतामणी भोजने,जालिंदर भोजने, कैलास भोजने तसेच जारकवाडी गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जालिंदर भांड,संजय रोडे, भिकन वारे, नवनाथ जा, मारुती भांड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी देवडे यांनी केले तर आभार जालिंदर भांड यांनी मांडले.