आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे(ता.आंबेगाव)येथे श्रमदानातून आणि लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा!!

शिरदाळे(ता.आंबेगाव)येथे श्रमदानातून आणि लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा!!

आंबेगाव तालुक्यातील उंचावर असणारे शिरदाळे गाव तसे लहानच गाव परंतु कायम विविध उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात ,जिल्ह्यात काही चर्चिले जाणारे हे छोटेशे गाव पण गाव जरी छोटे असले तरी त्यांचे उपक्रम गावची एकजूट अतिशय वाखडण्याजोगी आहे.
ग्रामपंचायत ,वनविभाग यांच्या सूचनेवरून गावात वनराई बंधारा बांधण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले होते. लोकसहभागातून आणि श्रमदानातून हा बंधारा बांधण्याचे नियोजन होते. शेतीतील कामे चालू असताना देखील गावातील जेष्ठ मंडळी तरुण सहकारी यांनी मोलाचे सहकार्य करत हा बंधारा बांधून पूर्ण केला. मंचर वनक्षेत्राच्या प्रमुख सौ.स्मिता राजहंस यांनी देखील यात सहभागी होऊन हे काम पूर्ण केले. त्यांच्यासोबत धामणी विभागाच्या वनपाल सौ.सोनल भालेराव,पूजा पवार,दिलीप वाघ यांनी देखील यात सहभागी होऊन श्रमदान केले.
खरं तर जिल्हाधिकारी श्री.राजेशजी देशमुख यांची ही महत्वकांक्षी योजना असल्याने आज ते स्वतः या श्रमदानात सहभागी होणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले होते परंतु काहीतरी अपरिहार्य कारणाने ते जरी येऊ शकले नाही तरी ग्रामस्थांनी कुठलीही दिरंगाई न करता हा वनराई बंधारा बांधून पूर्ण केला. याचा फायदा पाणी अडवण्यासाठी होणार असून असे अनेक बंधारे जर बांधले तर त्याचा जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होऊन त्याचा फायदा गावाला होणार आहे.
यावेळी उपसरपंच बीपीन चौधरी,मा सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,गणेश तांबे, सोसायटी चेअरमन कोंडीभाऊ तांबे,मा.चेअरमन कांताराम तांबे,CRP सुनीता चौधरी,मुख्याध्यापक गाढवे सर, कल्पेश सरडे,तान्हाजी महाराज तांबे,केरभाऊ तांबे,आशा वर्कर सविता मिंडे,अंगणवाडी सेविका जया रणपिसे,शंकर तांबे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

वनविभागाने पुढाकार घेऊन प्रत्येक गावात असे वनराई बंधारे बांधण्याची गरज असून त्यातून जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. डोंगराळ भागात अधिकच्या प्रमाणात हे बंधारे होण्याची गरज असून त्या साठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याची गरज आहे. हल्ली लोकांची श्रमदान करण्याची मानसिकता जरी नसली तरी अशा कामात एक तास भर जरी श्रमदान केले तर त्याचा मोठा फायदा होईल असे मत शिरदाळे गावाचे मा.उपसरपंच श्री.मयुर सरडे यांनी व्यक्त केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.