आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

आंबेगाव तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप सुरू!!

सर्वसामान्य लोकांची दिवाळी होणार गोड!!

आंबेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आनंदाचा शिधा” वाटप सुरू !!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून “आनंदाचा शिधा वाटप” ही योजना जाहीर केली होती.

या योजनेअंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संचात एक किलो रवा, एक किला चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश करण्यात आला असून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या शुभहस्ते नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.

सचिन बांगर यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती सरकारच्या धोरणांचे स्वागत करून हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, आदिवासी बांधव व महिला भगिनींसाठी काम करत असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याची भावना व्यक्त केली. दिवाळी निमित्त आनंदाचे शिधावाटप व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजारांचे विशेष अनुदान थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, मा.उपसरपंच अंकुश पोखरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, दिपक पोखरकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.