आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीने केला महिलांचा शिक्षकांचा सन्मान!!

विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीने केला महिलांचा शिक्षकांचा सन्मान!!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी ,साकोरी येथे जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ॲड.नूतन शेगर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली.त्यानंतर प्रमुख पाहुणे सौ नूतन शेगर तसेच , विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या सौ.रुपाली पवार (भालेराव) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.त्यानंतर संस्थेचे संस्थापक स.श्री पी एम साळवे ,पी एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे ,उपप्राचार्य शरद गोरडे ,विभागप्रमुख गणेश कर्डीले तसेच विद्यालयातील सर्व पुरुष शिक्षकांच्या वतीने प्रमुख पाहुणे व सर्व महिला शिक्षकांचा एक भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व प्राचार्यांनी महिला दिनाबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. सर्व मनोगतानंतर प्रमुख पाहुणे ॲड. नूतन शेगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यातून त्यांनी अनेक स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून दिली.तसेच स्त्रियांच्या समोर असणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणारी अनेक उदाहरणे दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश करडीले यांनी केले. तसेच श्री.विनोद उघडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने स्नेहभोजनही देण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.