
प्रतिनिधी । शिंगवे पारगाव- समीर गोरडे
शिंगवे पारगाव : आंबेगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य श्वेताताई ढोबळे, अकिंताताई वाळुंज,भिमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाव्हळ,पोलीस पाटील गणेश पंडित ,मा.उपसरपंच हिरामण गोरडे आदी पदाधिकारी यांचे उपस्थितीत पोलिओ मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्याचे नियोजन ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचन्द्र हंकारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास मैड, डॉ.शेख यांचे टीमने अंकीता शिंदे, रसिका गायकवाड, आशा वर्कर वैशाली साळी, साधना हाटकर, सुरेखा गाढवे,अंगणवाडी ताई यांच्या मार्फत लसीकरण उत्साहात पार पाडले.

आंबेगाव तालुक्यातील साहाशे चोवीस कर्मचाऱ्यांमार्फत दोनशे पंचेचाळीस बूथवर चौदा हजार एकशे वीस बालकांना ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य विभागाने नियोजन करण्यात आले. बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बूथ स्थापन करण्यात आले होते. नागरिकांनी जवळच्या पोलिओ बूथवर आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बाळाला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोलिओ डोस पाजण्यात आले.




