सामाजिक

पुणे जिल्हा परिषदेकडून शेतकरी व पशुपालकांना ७५ टक्के अनुदानाची सुवर्णसंधी ; कृषी अवजारे, मिल्किंग मशीन, गोठा साहित्यांसह विविध साधनांचा योजनेंतर्गत लाभ; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर

1011782482

पंचनामा पुणे : शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासह पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकरी व पशुपालकांना विविध कृषी अवजारे, साहित्य आणि आधुनिक साधनसामग्रीवर तब्बल ७५ टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

1011782569

या योजनेंतर्गत पशुपालकांसाठी गोठा साहित्य, मिल्किंग मशीन, मुरघास युनिट, रबर मॅट, कडबा कुट्टी मशीन, तसेच कुक्कुटपालन व शेळीपालनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोटार पंप, ठिबक सिंचन साहित्य, ताडपत्री, बॅटरी ऑपरेटेड पंप आणि भात लागवड यंत्रे अशा विविध साधनांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे. अनुदानाच्या माध्यमातून आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाल्यास शेती व पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.

अर्जासाठी महत्त्वाची माहिती :

  • अनुदान : ७५ टक्के
  • अर्जाची पद्धत : ऑनलाइन
  • अर्जाची अंतिम मुदत : ३० नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत संकेतस्थळ : https://zppunecessyojana.com/

पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी व पशुपालकांनी या योजनेची माहिती संकेतस्थळावर तपासून आवश्यक कागदपत्रांसह मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा आणि शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 411614
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 411616

Related posts

बर्डमॅन सुमेध वाघमारे – पक्ष्यांसाठी जगणारा एक संवेदनशील माणूस !!

Chief Editor

जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा !!

Chief Editor

Leave a Comment