सामाजिक

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा !!

img 20261122 wa0160
1011777717

ज्वारीचे १० हजार व हरभराचे २ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे मिनीकिट वाटप करण्यात येणार !!

पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यात कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३ तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियान योजनेअंतर्गत ज्वारी पिकाच्या फुले यशोमती या वाणाचे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे वाटप करण्यात आलेल्या बहुतांश ठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहे.

चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे रब्बी हंगामात विहिरी, कॅनॉल, तलाव बोअरवेल या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकते अशा ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणी केल्यानंतर त्यास २ ते ३ संरक्षित पाणी मिळाले तर ज्वारीचे धान्याचे उत्पादन होईल तसेच जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होईल, यामुळे चारा टंचाईचा प्रश्न देखील निकाली निघू शकतो.

शेतकऱ्यांना अजून १० हजार एकर क्षेत्रावर मोफत बियाणाचा पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू असून, सदर बियाणे येत्या २ ते ३ दिवसात शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांना ज्वारी पिकाची पेरणी करायची आहे अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

1011769281

रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात हरभरा हे प्रमुख पीक आहे. हरभरा पिकास कमी प्रमाणात पाणी लागते. २ ते ३ वेळेस पाणी दिल्यास हरभरा पीकाचे उत्पादन चांगले येते व जमिनीचा पोत देखील सुधारतो. हरभरा कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पिकास चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पसंती आहे . ज्या ठिकाणी ऊस तुटून जात आहे व उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू शकते अशा ठिकाणी उसाचा खोडवा न राखता हरभरा पीक केल्यास, पीक फेरपालट होऊन बेवडदेखील होतो व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच पुढील पीक चांगल्या प्रमाणात घेता येते.याकरिता चालू रब्बी हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात जवळपास ६ हजार ३२० एकर क्षेत्रासाठी हरभराचे मोफत बियाणे वाटप केले आहे. तसेच यापुढे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरभरा बियाणाचे महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे या घटकासाठी अर्ज न करता मिनीकिट या घटकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Related posts

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

खडकवाडीच्या कबड्डीपटू मुलींना श्रीनाथ पतसंस्थेचा मदतीचा हात ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ९ हजार रुपयांचे क्रीडा किट भेट; विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक !!

Chief Editor

कु.सुवर्णा बबन आव्हाड – एका चिमुरडीच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी !!

Chief Editor

Leave a Comment