सामाजिक

लोणी येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा !!

1011331520

सोनाली खाडे यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व !!

लोणी, ता. आंबेगाव : विकास वाचनालय लोणी, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी, श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचन संस्कृती रुजविणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

1011331476

कार्यक्रमाची सुरुवात हायस्कूलपासून विकास वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी व गावातून प्रभातफेरी काढून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यालक्ष्मी प्रकाशन व वितरण या संस्थेच्या प्रकाशिका सौ.योगिता अक्षय सुतार व लेखक मुबिन मुंढे सर व मान्यवरांच्या हस्ते ‘शब्द मोहोर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात माईड मिरॅकलच्या संस्थापिका सोनाली खाडे मॅडम यांनी ‘शोध मनाच्या अस्तित्वाचा, वाचन संस्कृती, विचारांची समृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. वाचनामुळे माणसाच्या विचारांना योग्य दिशा मिळते, ज्ञानात भर पडते आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असे महत्त्व त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

1011331520

या कार्यक्रमाला मा.श्री.सचिन कांडगे साहेब, मा. डॉ. सावळाभाऊ नाईक आणि मा. श्री. किरणशेठ वाळुंज पा.,श्री.तांबे महाराज श्री.प्रदीप कोचर,श्री.पिंटूशेठ पडवळ, श्री.चंद्रकात गायकवाड, श्री. बाळासाहेब वाळुंज,प्रकाश सिनलकर,हर्षल सुतार , सुधीर सोनार, विशाल उदागे, अमित क्षीरसागर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गीतांजली लंके व उपाध्यक्ष श्री.राहुल भागवत व माधुरीताई खंडागळे ( माजी अध्यक्ष)यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच विकास वाचनालयाचे संस्थापक व कार्यवाहक ग्रंथामित्र श्री. धों. स. सुतार गुरुजी, अध्यक्ष श्री. रमेश धों. सुतार, संचालक श्री. अक्षय उमेश सुतार, श्री भैरवनाथ प्रशालेचे प्राचार्य श्री. सुनील थोरात सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीचे मुख्याध्यापक श्री. मुबीन मुंढे सर यांच्यासह शिक्षकवृंद, पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

1011331549

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि ज्ञानाची ओढ वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारांतून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

विकास वाचनालय लोणी व सर्व सहकारी संस्थांच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.

1011291592

Related posts

पंचनामा विशेष – असे तमाशाफड ;असे तमाशाफड व्यवस्थापक -मा. पोपट बेंगारेमामा

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’ संकल्पना राबवली जाणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Chief Editor

Leave a Comment