
पंचनामा प्रतिनिधी – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी प्रास्ताविकातून नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचे स्वागत केले.शिक्षक मतदारसंघातून मिळविलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक कार्याची आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी समर्थच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत आमदार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.तसेच खाजगी संस्थांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांची चर्चात्मक संवाद साधताना आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले की, समर्थ शैक्षणिक संकुलाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संकुलामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेची ही शैक्षणिक वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात समर्थ शैक्षणिक संकुलाच्या विकासात्मक आणि शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य केले जाईल.संकुलाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समर्थच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ओंकार भोर, वैष्णवी मोरे, आदित्य कांबळे आणि अथर्व थोरात या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच रायफल शूटिंग स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या इशिता काकडे हिचाही विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, संतोष नाना खैरे, गणेशजी कवडे, अमोलजी शिंदे, आशिष माळवदकर, राजू पानमंद,जी. के. औटी सर, नरेंद्र गटकळ, लक्ष्मणजी फावडे, बंटीशेठ कोकणे, दौलतजी बांगर, भाऊशेठ गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.याशिवाय संस्थेचे सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी केले, तर क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




