सामाजिक

मंचर येथे १५३ शिक्षकांसाठी निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरू ; आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन; २२ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन !!

1011762865
1011762965

पंचनामा प्रतिनिधी – मंचर : शिक्षकांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासह अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात निवड वेतनश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. १३ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात आंबेगाव तालुक्यातील तब्बल १५३ शिक्षक सहभागी झाले आहेत.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणेचे प्राचार्य नामदेव शेंडकर आणि पंचायत समिती आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य नितीन बाणखेले यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख पंकजा हगवणे, राजू जाधव, गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ व सुलभक उपस्थित होते.

1011762898

सेवेची २४ वर्षे पूर्ण केलेल्या ८१ शिक्षकांनी निवड वेतनश्रेणीसाठी, तर १२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या ७२ शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा एकूण १५३ शिक्षकांना प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जात आहे.

बदलत्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करून प्रशिक्षणासाठी विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२०, सेवाविषयक नियम, शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिक कौशल्यवृद्धी, अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, शासनाच्या विविध योजना तसेच निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी आवश्यक बाबींचा समावेश आहे.

1011762874

दरम्यान, योजना कार्यालय, महाराष्ट्र राज्याचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अधिव्याख्याता तथा आंबेगाव संपर्कप्रमुख राजश्री तिटकारे यांनीही प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला.

निवड वेतनश्रेणीसाठी नारायण गोरे, योगेश देशमुख, तुषार शिंदे, संतोष शिंदे, नीलिमा वळसे, भगवान भोर व दत्तात्रय आहिरे, तर वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी सुदाम जोशी, नारायण चित्ते, इंद्रभान भोर व सचिन रोडे हे सुलभक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत.

1011762858

प्रशिक्षणाचे आंबेगाव तालुका समन्वयक म्हणून विषयतज्ज्ञ परमेश्वर काकडे व ज्योत्सना माशेरे नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षकांना सेवाविषयक नियमांचे सखोल ज्ञान मिळण्याबरोबरच अध्यापनातील आधुनिक संकल्पना, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण गोरे यांनी केले, तर विषयतज्ज्ञ योगेश देशमुख यांनी आभार मानले.

1011762842
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 411614
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 411616

Related posts

गजानन क्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !!

Chief Editor

पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकी वाहनांची नवीन मालिका सुरू ; पसंतीच्या क्रमांकासाठी १८ व १९ नोव्हेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार ; अर्ज करण्याचे आवाहन !!

Chief Editor

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा विकास करावा – ज्येष्ठ विधितज्ञ सतीषचंद्र सुद्रिक

Chief Editor

Leave a Comment