
प्रतिनिधी-समीर गोरडे आंबेगाव तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती, नवोदय, इस्रो-नासा, सैनिकी शाळा आदी स्पर्धा परीक्षांची प्रत्येक शाळेमध्ये नियोजनबद्ध तयारी चालू आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख यांनी केलेल्या नियोजनबद्ध उपक्रमांमुळे यावर्षी जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक संख्येत तृतीय क्रमांकावर मिळाला.

गटशिक्षणाधिकारी श्रीमती रूपाली धोका यांनी अचानक वळती केंद्रातील विविध शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रप्रमुख राजू जाधव उपस्थित होते.

वळती शाळेमध्ये इयत्ता चौथी,पाचवी आणि सातवीचे शिष्यवृत्ती व नवोदय वर्ग चालू असल्याचे पाहून रुपाली धोका यांनी समाधान व्यक्त केले. देविदास शेळके संतोष जाधव भोकरवस्ती शाळेतील मुख्याध्यापिका स्नेहल लोखंडे यांचा वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असल्याचे दिसले. भागडी शाळेमध्ये बाळासाहेब गिलबिले व लालन गायकवाड यांचे चौथी व सातवीचे शिष्यवृत्ती वर्ग चालू होते. जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळेतील चौथी,पाचवी व सातवी तिन्ही वर्गांचे शिष्यवृत्ती-नवोदय वर्ग चालू असुन यावेळी अशोक लोखंडे,विलास भोर, मार्गदर्शक शिक्षक श्रीकृष्ण डुकरे,वैजंता लोखंडे हे शिक्षक शिष्यवृत्ती तास घेताना दिसले,
साकोरे मळा शिंगवे शाळेतही इयत्ता चौथीचे अभिजीत नाटे व पाचवीचे नवोदय शिक्षक नितीन शेजवळ नवोदय विद्यालयाचे तास घेत असल्याचे पहावयास मिळाले .

साकोरे मळा, नागापूर, भागडी, वळती, जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे, गाढवे, गोरडे मळा, भोकर वस्ती आदी शाळांमध्ये शिष्यवृत्ती वर्ग चालू असल्याचे पाहून रूपाली धोका यांनी समाधान व्यक्त केले, शिक्षकांची पाठ थोपटली व त्यांचा सन्मान केला. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वळती केंद्रामध्ये दिलेल्या भेटीअंती जवळजवळ ११ पैकी भोकर वस्ती, वळती, शिंगवे, भागडी, गाढवे,गोरडे मळा, साकोरे मळा, नागापूर या शाळांमध्ये शिष्यवृत्तीचे वर्ग चालू असल्याचे पहावयास मिळाले.

“दिवाळी सुट्टीमध्येही वळती केंद्रातील शिक्षक उत्साहाने अध्यापनाचे काम करत असल्याचे पाहून अतिशय समाधान वाटले. ११ पैकी ८ शाळांमध्ये शिष्यवृत्ती-नवोदय वर्ग सुरू आहेत, ही खूप अभिमानाची बाब आहे. शिक्षकांच्या या मेहनतीमुळेच आंबेगाव तालुका जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर मिळाला. सर्व शिक्षकांचे मी कौतुक करते असे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आंबेगाव.
रूपाली धोका म्हणाल्या.
आंबेगाव तालुक्यांमध्ये वारंवार शैक्षणिक उपक्रम बाबतच्या मार्गदर्शनामुळे व गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांनी तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केल्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे निश्चितच शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेच्या बाबत उत्साह वाढल्याचे दिसून येते.. असे केंद्र प्रमुख वळती राजु जाधव यांनी सांगितले.






