सामाजिक

आविष्कार’ विद्यापीठस्तरीय स्पर्धेत समर्थ फार्मसीचे दुहेरी यश; ओंकार भोर व वैष्णवी मोरे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !!

1011752832
1011752832


पंचनामा प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (DBATU) यांच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी ओंकार भोर याने शुद्ध विज्ञान (Pure Science) गटात, तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी वैष्णवी मोरे हिने कृषी व पशुसंवर्धन (Agriculture and Animal Husbandry) गटात तृतीय क्रमांक पटकाविला. या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेमध्ये विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपापले संशोधनात्मक प्रकल्प सादर करून सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला, नावीन्यपूर्ण संकल्पनांना तसेच विविध क्षेत्रांतील समस्यांवर संशोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या क्षमतेला प्राधान्य देण्यात आले. अशा चुरशीच्या स्पर्धेत ओंकार भोर याने शुद्ध विज्ञान गटात आपल्या संशोधनात्मक प्रकल्पाच्या प्रभावी सादरीकरणातून तृतीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे वैष्णवी मोरे हिने कृषी व पशुसंवर्धन या विषयातील संशोधन प्रकल्पाच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळवत यशाची मोहोर उमटविली.
दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सातत्याने विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम राबविले जातात. या यशासाठी महाविद्यालयांचे आविष्कार समन्वयक डॉ. मंगेश होले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यापीठस्तरीय स्पर्धेत कांस्य पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, डॉ. शरद पारखे तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य व विभागप्रमुख यांनी ओंकार भोर व वैष्णवी मोरे यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

1011737225

Related posts

लोणी (धामणी ) गावाने जपली कलगीतुऱ्याची परंपरा; नागपंचमीच्या निमित्ताने रंगणार कलगीतुऱ्याचा सामना !!

Chief Editor

तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात !!

Chief Editor

रक्षाबंधन सणानिमित्त बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन ; कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह- डॉ. सुहास वारके

Chief Editor

Leave a Comment