सामाजिक

खडकवाडी गावचे मा.सरपंच अनिलशेठ डोके यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव !!

1010632967
1010632967

पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी (ता. आंबेगाव) गावचे मा.सरपंच मा.श्री. अनिलशेठ सखाराम डोके यांना ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानामुळे खडकवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य, तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन डोके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे हा पुरस्कार खडकवाडी ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता पुणे येथील म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अनिल डोके यांच्या सन्मानाबद्दल खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

1010457105
1010480394

Related posts

माळरानावर बहरतेय कलिंगडाची शेती; धामणी गाव पुसू पाहते आहे आपली दुष्काळी ओळख !!

Chief Editor

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही ;१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये !!

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल जांभोरीत कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी!!

Chief Editor

Leave a Comment