आरोग्य व शिक्षण

डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील व प्रतिक चव्हाण निर्मित, महेश काळे दिग्दर्शित टर्री या चित्रपटाचे प्रमोशन मंचर येथील आण्णासाहेब आवटे महाविद्यालयात झाले संपन्न!!

मंचर, तालुका – आंबेगाव येथील आण्णासाहेब आवटे महाविद्यालयात डायनालॉग इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील व प्रतिक चव्हाण निर्मित, महेश काळे दिग्दर्शित टर्री या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत सिने अभिनेते ललित प्रभाकर व सिने अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची मुख्य नायिका गौरी नलावडे, अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा चित्रपट फक्त मनोरंजन करणारा नसून तरुणांना स्फूर्ती देणारा, मार्गदर्शन करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चित्रपटातील गाणी वाजवून दाखवण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चित्रपटातील कलाकारांसोबत गाण्यावर नृत्य केले.

चित्रपटातील कलाकार व मान्यवरांचा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.पी. गार्डी यांनी सत्कार केला. यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, युवासेना तालुका समन्वयक कौस्तुभ शिंदे, आकाश मोरडे, शहरप्रमुख माऊली लोखंडे, तेजस जाधव यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. जी.सी.वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.के.एस.एरंडे यांनी आभार मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.