आरोग्य व शिक्षण

शिरदाळे येथे गावातील विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा!!

कु.राजवीर योगेश तांबे यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेला भेटवस्तू!!

शिरदाळे येथे गावातील विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा!!

आज भारताचा ७४ प्रजासत्ताक दिन शिरदाळे येथे मोठ्या आनंदात उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजापूजन मुख्याध्यापक श्री.गाढवे सर यांच्या सुचनेने शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री.निवृत्ती तांबे, सदस्य सौ.दीपाली संदेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील दोन प्रगतशील शेतकरी श्री.शांताराम चौधरी व श्री.निवृत्ती मिंडे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. त्यानंतर गावातील दानशूर व्यक्तिमत्व श्री.शंकर दत्तात्रय तांबे व त्यांच्या सौभाग्यवती , शिरदाळे गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कामात हातभार लावणारे श्री.योगेश मारुती तांबे व सौ.संतोषी योगेश तांबे तसेच गावच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेणारे श्री.सुनील मनोहर रणपिसे व सौ.मोनाली सुनील रणपिसे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामपंचायत ध्वजारोहण संपन्न झाले. दर वेळी आपण गावचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व गावातील पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम घेत असतो परंतु या वर्षी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच सर्व सदस्य कमिटीने निर्णय घेत हा मान गावातील विधवा महिला,सरकारी सेवेतील मुले व त्यांचे पालक तसेच मा.सैनिक व गुणवंत विद्यार्थी यांना देण्याचे ठरावले होते. त्यानुसार ग्रामपंचायत ध्वजापूजन श्री.व सौ.शालन रामदास नामदेव तांबे,श्री.व सौ.सवित्राबाई बाळू रखमा चौधरी ,श्री व सौ.मीना सुरेश गेनभाऊ तांबे तसेच हयात असताना गावची निस्वार्थी सेवा करणारे कै. महादू भिका तांबे यांचे चिरंजीव श्री.व सौ.इंदूबाई सुभाष महादू तांबे यांना पूजनाचा मान दिला. तर माजी सैनिक श्री.कचर तांबे , सोसायटी संचालक कोंडीभाऊ तांबे व कांताराम तांबे यांना नारळ वाढवण्याचा मान दिला. तसेच ग्रामपंचायत ध्वजारोहण प्रथमच गावातील विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. यात श्रीमती गुंफाबाई महादू रणपिसे, श्रीमती गाजराबाई राधु थांबे,श्रीमती कांताबाई कैलास तांबे,श्रीमती कासुबाई विश्वनाथ तांबे ,श्रीमती कचराबाई नामदेव तांबे या महिलांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत ने एक आदर्श उपक्रम राबविला असल्याचे कौतुक यावेळी ग्रामस्थांनी केले. यावेळी शिरदाळे गावच्या सरपंच सौ.वंदना गणेश तांबे,उपसरपंच श्री.मयुर संभाजी सरडे,मा.सरपंच श्री.मनोज तांबे,ग्रामपंचायत सदस्य श्री.बिपीन चौधरी,श्री.गणेश तांबे,संतोष रणपिसे ,पोलीस पाटील सौ.कल्पना चौधरी ,मुख्याध्यापक गाढवे सर अंगणवाडी सेविका सौ.शांताबाई चौधरी,सौ.जया रणपिसे तसेच ग्रामस्थ आणि युवक व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

कु.राजवीर योगेश तांबे यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेला भेटवस्तू!!

त्यानंतर शिरदाळे गावचे युवा उद्योजक श्री.योगेश मारुती तांबे व सौ.संतोषी योगेश तांबे यांचे चिरंजीव कु.राजवीर योगेश तांबे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे यांना त्यांच्यावतीने उत्तम दर्जाचे प्लायवूड टेबल व दोन खुर्ची तसेच अंगणवाडी साठी डबल बर्नर शेगडी त्यांनी भेट म्हणून दिली. तर शाळेच्या आणि ग्रामपंचायत च्या वतीने केक कापून राजवीरचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रम उत्तम झाल्याची पावती देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.