सामाजिक

मंचर (ता.आंबेगाव) एस.टी.बस स्थानकाचा होणार कायापालट; ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी;मा.मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !!

img 20260401 wa0283
img 20260401 wa0283

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंचर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा झाली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंचर बस स्थानकाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

​जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

​मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी:
​मंचर बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारा चिखल व धुळीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी खालील दोन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत:
​१. सिमेंट काँक्रीटीकरण: बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ होणार आहे.

२.संरक्षक भिंत: स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला १९ लाख ९९ हजार ५८९ रुपये मंजूर झाले आहेत.

​मंचर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी मिळावा म्हणून शासनाकडे आणि जिल्हा नियोजन समितीकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

​”मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”दिलीप वळसे पाटील (मा.मंत्री, आमदार आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ)

fb img 1773887073740

Related posts

निवेदन क्षेत्रातील कोहिनूर श्री. मयूर संभाजी सरडे

Chief Editor

समर्थ गुरुकुलमध्ये ‘समर्थ बालमहोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

जुन्या आराखड्या प्रमाणे कांदाचाळ उभारणीस परवानगी द्यावी- प.स.सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment