आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

नॉलेज-कॉलेज-व्हिलेज संकल्पनेतून गावचा शाश्वत विकास!!

नॉलेज-कॉलेज-व्हिलेज संकल्पनेतून गावचा शाश्वत विकास!!

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था (अभिमत विद्यापीठ) पुणे संचलित डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजने अंतर्गत ज्ञानग्राम-शाश्वत ग्राम या विषयावर नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन राजुरी ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.कैलास बवले म्हणाले कि,उन्नत भारत अभियान,उन्नत महाराष्ट्र अभियान हे उच्च शिक्षणाला गावाच्या शाश्वत विकासाशी जोडणारे महत्वाकांक्षी उपक्रम आहेत.नवीन राष्ट्रीय धोरण २०२० च्या अंमलबजावणी अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश आणि शाश्वत विकास ध्येये २०३० च्या अनुषंगाने सर्व बाबी कॉलेज आणि उच्च विज्ञान-तंत्रज्ञानाला गावापर्यंत नेण्यासाठी मदत करणार आहेत.
राजुरी गावामध्ये शाश्वत ग्राम विकासाचे सात महत्वाचे संशोधन प्रकल्प विद्यार्थी व प्राध्यापक यांचे सहयोगाने हाती घेण्यात येत आहेत.
जैव विविधता (पर्यावरणीय शाश्वतता),जल संवर्धन जल सुरक्षा,गुणवत्तापूर्ण विकास शिक्षण,स्वास्थ्यपूर्ण आरोग्य,हरित ऊर्जा-(वेस्ट टू वेल्थ),स्थानिक विकास प्रशासन सक्षमीकरण,शाश्वत शेती या विषयाबाबत समस्या संशोधन व प्रशिक्षण आणि समस्या निराकरण उपाय शोधून राज्याच्या विकासात उच्च शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या योजनांचा उपयोग करून घेण्यात होणार आहे असे डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.कैलास बवले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी परिसरातील विकाससंबंधी छोट्या छोट्या प्रश्नावर अभ्यास व संशोधन करून अहवाल तयार करावेत,प्राध्यापकांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी.
या प्रसंगी राजुरी गावाच्या सरपंच प्रिया हाडवळे,उपसरपंच माऊली शेठ शेळके,ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले,सर्व ग्रामपंचायत सदस्य,रमेश औटी,दत्ताशेठ हाडवळे,गोरक्ष हाडवळे,तलाठी भोसले भाऊसाहेब,दत्ताशेठ कणसे,नितीन औटी आणि विविध पदाधिकारी यांचेसमवेतही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे येथील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विविध शाखा व विभागांचे विभागप्रमुख,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विपुल नवले,प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.