आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

कौशल्यासोबत स्वयंप्रेरणा आणि शिस्त महत्वाची-अभिषेक सावेकर

समर्थ आय टी आय मध्ये रोजगार कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन!!

कौशल्यासोबत स्वयंप्रेरणा आणि शिस्त महत्वाची-अभिषेक सावेकर

समर्थ आय टी आय मध्ये रोजगार कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन!!

टाटा मोटर्स व वाय फोर डी फाऊंडेशन पुणे आणि समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिटयूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दोन दिवसीय रोजगार कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था माणिकडोह चे प्राचार्य प्रा.दत्तात्रय जगताप यांचे शुभेच्छा हस्ते करण्यात आले.
सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाय फोर डी फाउंडेशन चे अधिकारी अभिषेक सावेकर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,पॉलिटेक्निक प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच सर्व विभागाचे निदेशक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिषेक सावेकर यांनी वेगवेगळे महत्व पूर्ण मुद्दे मांडताना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्व विकास कौशल्याबरोबर स्वयंप्रेरणा व शिस्त आणि जागरूकता आवश्यक असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती,निरक्षण व श्राव्य कौशल्य,वेळेचे नियोजन,मुलाखतीचे तंत्र,उद्योजकता,नेतृत्वगुण,पर्यावरण संरक्षण,सवांद कौशल्य,कामगार फायदे इत्यादीचे परिपूर्ण अशा रीतीने प्रशिक्षण देण्यात आले.
संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेमध्ये विदयार्थ्यांसाठी नेहमीच वैविद्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत माहिती देऊन या पुढील काळात सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
आभार व्यक्त करताना प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी गुणवत्तापूर्ण कौशल्यात्मक शिक्षण हेच आमचे ब्रीद आहे तसेच या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये निश्चितचं फायदा होईल असे या वेळी सांगितले.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्व आय टी आय च्या शिक्षकांनी नियोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख उपप्राचार्य विष्णू मापारी सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत औटी यांनी केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.