आपला जिल्हाताज्या घडामोडी

जारकरवाडी (ता.आंबेगाव) च्या हद्दीत पाटीलमळा येथे भरघाव ढंपरच्या धडकेत महिला ठार

जारकरवाडी गावच्या हद्दीत पारगाव जारकरवाडी रोडवर पाटीलमळा येथे रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या वंदना धोंडीभाऊ लबडे वय ४० रा. जारकरवाडी ता. आंबेगाव या महिलेस एम एच १४ केएल ६४६९ या ढपरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात ढपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद धोंडीभाऊ अहिलाजी लबडे यांनी दिली आहे.

दिनांक ३/१/२०२३ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वंदना लबडे ही महिला रोडच्या कडेला मेंढरे रोडवर येऊ नये म्हणून उभी होती. त्यावेळी धामणी बाजू कडून पारगाव बाजूकडे येणाऱ्या भरधाव ढपरने वंदना यांना धडक दिली. या अपघातात त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. डंपर चालक कुठलीही मदत न करता अपघात होतात पळून गेला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कालेकर करत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.