आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रराजकीय

वाघटी(Rusty Soptted Cat)जातीच्या मांजराची पिल्ले पुन्हा विसावली आईच्या कुशीत!!

पिल्ले व आई यांची यशस्वी पुनर्भेट!!

दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी, यवत जवळ वाघाटी म्हणजेच ( Rusty spotted cat ) या मांजराची दोन छोटी पिल्ले ऊस तोडी दरम्यान सापडली. शेतकरी योगेश हाते यांनी वनविभाग दौंड व ECO RESQ TEAM दौंड यांना ही बातमी कळवली. बातमी कळताच ECO RESQ TEAM दौंड यांनी पुनर्भेट प्रक्रिया करायचे ठरवले दौंड तालुक्याच्या RFO सौ. कल्याणी गोडसे मॅडम आणि ACF श्री. दीपक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ECO RESQ टीम यांनी सापडलेल्या दिवशी यशस्वी पुनर्भेट घडवून आणली.
वाघाटी मांजर ही भारतातील सगळ्यात आकाराने लहान मांजराची जात म्हणून ओळखली जाते दौंड तालुक्यातील ऊस क्षेत्रात यांची चांगली संख्या आहे. ऊसात आपले आयुष्य जगणारी ही मांजर अतिशय दुर्मिळ आहे व अति संरक्षित आहे म्हणजेच ( schedule 1 ) मध्ये मोडली जाते. यांना वाघा प्रमाणे कायद्या ने सुरक्षा देण्यात आली आहे. यांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर ही मांजर देखील नामशेष होईल अशी भीती आहे.
ही पिल्ले ऊस तोडी दरम्यान सापडल्या नंतर त्यांची वैद्यकिय तपासणी व निगराणी करून त्याचं दिवशी त्याचं ठिकाणी पिल्ले कॅमेराच्या परिघात ठेवण्यात आली मागील काही दिवस प्रचंड पाऊस असल्याने ECO RESQ टीम समोर मोठे आव्हान होते या वर मात करत टीम ने पुनर्भेट प्रक्रिया सुरू ठेवली व काही तासात च मादी वाघटी आली आणि पिल्लांना घेऊन गेली. दौंड तालुक्यात असे या आधी देखील अनेक वेळा यशस्वी पुनर्भेट घडविण्यात ECO RESQ टीम ला यश आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.