आवटे महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी !!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. गायकवाड यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थित विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना कर्मवीरांच्या कार्याची माहिती देताना म्हणाले,
भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढविण्यासाठी तसेच मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करण्यासाठी वसतिगृहे सुरू केली असे प्रतिपादन केले.

त्यानंतर मंचर शहरातून ढोल ताश्याच्या गजरात महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रभातफेरी काढण्यात आली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. साळके, डॉ . शाम मिसाळ, प्रा. ए. डी. झावरे, अधीक्षक श्री. आर.एम. मेचकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

