आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी – लोणी रस्त्याच्या कडेला मेलेल्या कोंबड्यांचा पडतोय खच!!

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव ) या परिसरातील धामणी,लोणी रस्त्यावर धामणी बाजूकडील असणाऱ्या पांगुळटिका परिसरामध्ये नेहमीच मेलेल्या कोंबड्या टाकल्या जातात. मंगळवार (दि.२४ ) पहाटेच्या सुमारास तब्बल २५०-३०० मेलेल्या कोंबड्या टाकण्यात आल्या होत्या. सकाळी काही नागरिकांनी पिंजऱ्याची गाडी तिथुन जाताना पाहिली. त्या गाडीला थांबवायचा प्रयत्न केला परंतू ती गाडी खूप भरधाव वेगाने निघून गेली होती.

गेल्या अनेक वर्षापासून लोणी,धामणी रस्त्यावरील असणाऱ्या माळरानावर मेलेल्या कोंबड्या व जनावरे टाकली जातात. त्यामुळे त्या ठिकाणावरील असणाऱ्या चराऊ रानातील जनावरांना त्रास होतो.धामणी कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाला अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात.मेलेल्या कोंबड्यामुळे दुर्गंधी सुटून त्या परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पहाटे टाकलेल्या ३०० कोंबड्या या पावसाच्या पाण्याने सडून त्याचा वास सुटलेला होता.या ठिकाणी धामणी गावचे उपसरपंच अक्षयराजे विधाटे यांनी तत्काळ पोकलेन मशीन बोलवून मोठा खड्डा घेऊन धामणी पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ.पांडे यांच्या समक्ष कोंबड्या त्या ठिकाणी गाडण्यात आल्या.

धामणी गावातील पोल्ट्री व्यावसायिकांना भेटुन माहिती घेणार आहे.त्या ठिकाणी जर इथून पुढे कोणी कोंबड्या किंवा जनावरे टाकताना आढळलं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असे उपसरपंच अक्षयराजे विधाटे यांनी पंचनामा न्यूजशी बोलताना सांगितले.

पशुवैद्यकीय डॉ. संजय पांडे यांनी परिसरामध्ये असणाऱ्या सगळ्या व्यवसायीकांना आवाहन केले आहे की मेलेल्या कोंबड्या आपल्याच शेताच्या परिसरामध्ये गाडुन टाकल्या पाहिजे.सर्व पोल्ट्री व्यवसायिकांना लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. यावेळी मा.सरपंच सागर जाधव ,माधव बोऱ्हाडे,शरद जाधव ,संजय बढेकर,पोपट बोऱ्हाडे,संदिप रोडे , रामदास गाढवे , स्वप्निल जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश कदम यांच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून दिला.

या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव व रूपेश जाधव यांनी संबंधीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

या संदर्भात धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांच्याशी संपर्क केला असता जर यापुढे असे निदर्शनास आल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.